हे नाते लिहीले..

 

भावना तुझ्या
तुझ्यातला तो भाव
भावतो रे मला
असा कसा रे तू
असाच असतो का रे भाऊ
तू सांगशील का मला…

येता येता
तुझ्या आठवणीत
माझ्याही डोळ्यात
आले होते भरून
ह्या नात्यांच्या गाठी…
अश्याच असतात का रे…

खरय तुझ,
नाती असतातच अशी
जवळ असूनही भेटत नाही
तू दूर असलास तरी
तुझ्यी आठवण आज
आल्याविना राह्त नाही

पुन्हा तुझ्या ओवी
ओले करतात माझे डोळे
वाचूनी तुझी कविता….माझ्यासाठी…
म्हणूनच रे..
लिहीले हे नाते आज
फक्त तुझ्यासाठी

Advertisements

फेब्रुवारी 8, 2009 at 1:05 सकाळी यावर आपले मत नोंदवा

one last dance…..revisited

 

उष:काल विझता विझता……..
उगवते रात्र…..निजता निजता 
विझते रात्र…..तुझ्याच आठवणींत
झिजते मी प्रत्येक रात्र…….
येशील का रे माझ्यासाठी…..एकदाच…
for th last dance…for th last time……… 

असावी ती रात्र फक्त तुझ्यासाठी..
तू असावास फक्त माझ्यासाठी 
अनुभवावा तुझा हळूवार स्पर्श
चिंब व्हावे प्रणयात तुझ्या सहर्ष…..
देशील का हे सोनेरी क्षण….माझ्यासाठी….
shall v dance…togethr… for th last time……….

नसेल उद्या तुझा स्पर्श
नसेल तुझा सुगंध
असेल फक्त तुझी आठवण…
हीच असेल माझी साठवण…
देशील का ह्या आठवणी तू मला..
माझ्यासाठी…तुझ्यासाठी….जगण्यासाठी….

ही तारकाच शोधे चंद्रमा…
तू दिसतोस त्या चांदण्यात 
पाहते मी तुला माझ्या मिठीत….
त्या चांदण्या रात्रीत…जगताना….
त्याच आठवणीत पुन्हा पुन्हा जगताना..

येशील का रे सख्या…….एकदाच..
for the last dance…for the last time……………..

फेब्रुवारी 3, 2009 at 12:52 pm यावर आपले मत नोंदवा

one last dance

थोडा वेगळा प्रयत्न आहे माझा…
अभिप्राय…प्रतिक्रिया आणि टिका अपेक्षित…with a due respect

चांदण्यातली ती निळी रात्र
अलगदच जाणवणारा तुझा स्पर्श
तो चंद्रमा..त्या चंदेरी आठवणी….
देतात आज साथ तुलाच आठवताना
आठवशील का तू… ह्या आठवणींना
तुझे मिटलेले डोळे..माझ्या मिठीत
तुला स्पर्शताना..तुझ मिठीतले बहरणे…
सोबतीला उरले आता ते गोठलेले श्वास..
शोधले तुला धुसर आठवणींत
सावल्याच होत्या सर्व अनोळखी
त्याच धुसर प्रकाशात
शोधतोय मी आता तुझीच सावली…

so.. it was th last dance…
last dance….तू माझ्या मिठीत असताना…
last dance….तुझ्या गुलाबी ओठांना स्पर्शताना..
a last dance in the moon night
felt your love for the last time…

आता ह्या चांदण्या रात्रींत
शोधतो तुला मी त्या तारकांमध्ये
तो चंद्रमाही आहे आज साक्षीला…
कारण आहेस तू तीच तारका मज स्वप्नातली
येशील का ग परत?…

for th last dance…for the last time

डिसेंबर 17, 2008 at 7:17 pm यावर आपले मत नोंदवा

सोनेरी प्याला..

तल्लीन होऊनी नशेच्या
झालो नशीला मी मदिरेत
राज करीन सांगतो तुम्हाला…
साथी माझा हा सोनेरी प्याला…

तुटलो आज मी तुकड्यांतही
आह! या इश्काच्या दुनियेत..
ती मदिरा का…तिचे गुलाबी ओठ
अंधळा झालो मी माझ्याच नजरेत

धुंदीत मिसळला रंग नशेचा
धुंदीत उधळला रंग प्रेमाचा…
रंग रंग होऊनी गुंग..
झालो आज मी तुझा…
तू माझा मी तुझा…..
असाच आहे माझा सोनेरी प्याला…

मॄत्यू आहे..काही गम नाही…
व्हिस्की आहे पण रम नाही….
घोट घोट पिणार आयुष्य आता…
मग चला बसूया….
तूम्ही मी आणि हा सोनेरी प्याला..

@ …. शशांक नवलकर

डिसेंबर 17, 2008 at 7:10 pm यावर आपले मत नोंदवा

वलय…………

मृत्यू होता जन्म होतो..
जन्म होता मृत्यू….
आयुष्याला सीमा नसते….
मग का जगणे हे सीमीत असते?

अंधारातून चालत असता..
उजेडाची चाहूल असतेच……
उजेड पडतोच सर्वत्र पण,
काळोखाची ही साथ असतेच…

म्हणे…..प्रेम हे अमर असते……
का सारखे प्रेमात कोणीतरी मरत असते?
प्रेम करणारा प्रेम करत जातो…….
तो जाताना….त्याचे असे कोणीच नसते….

शून्याहून सुरूवात करूनी..
उभा राहीलो मी असा…
न पाहिले असे वलय मी……
जणू पुन्हा शून्यातून उभ रहावसे वाटते…..

– शशांक नवलकर

डिसेंबर 17, 2008 at 7:07 pm यावर आपले मत नोंदवा

birthday gift….

आठवणी देई साज तुझी
देवा कडे मागतो साथ तुझी..
असावा प्रत्येक क्षण तुझा सुखाचा..
देवाकडे मागतो तूला… एक birthday gift

लहान असताना हट्ट धरला..
मोठ होऊन मोठ व्हायचा…
मोठा झालो आता..पुन्हा लहान व्हावस वाटते…
तेच सर्व काही पुन्हा मागावस वाटते…

नातं असतेच इतक खास…
की तुटताना अश्रू देऊन जाते..न विझणाय्रा जखमा देऊन जाते
मी अशी नाती टिकावीत.. हा प्रयत्न करतो…प्रार्थना करतो….
असच अटूट नातं राहव तुझे माझ्याशी..असच एखादे gift द्यावसे वाटत…

अश्रू तुझ्या डोळ्यांतून पाझरतात
वेदना होतात काळजात..
पण असावे तुझ्या ओठावर हसू..
देवाची इच्छा असेलच तर आपण कायम frnds असू..

लिहीली कविता ही आज..
फक्त तुझ्यासाठी…
ह्याहून मोठे देणे मजकडे काहीच नाही..
कदाचित हेच आहे माझे birthday gift….
फक्त तुझ्याचसाठी…..

_@ शशांक नवलकर

नोव्हेंबर 24, 2008 at 2:41 pm १ प्रतिक्रिया

गळकी पाने…

आठवतो त्या आठवणी..
ते क्षण… त्या भावना….
असे सर्व काही ती डायरी….
विझले ते सर्व…ओल्या अश्रूंनी…
उरली ती आता गळकी पाने…

नावास एक डायरी..पुस्तक..आयुष्याचे!
पानं भरली सु:ख-दु:खाची
आठवणीतल्या चेहय्रांची….
काही पानं कोरीच राहून गेली…
काळासकट.. का ती गळून गेली….

पाने उलटता उलटता..
उमटतात ठसे कागदांवर त्या…
जिथे होती ती नावं..पुसली गेलेली…
लिहीता लिहीता अश्रू ओथंबले…
लिहावसे वाटले.. पण….ते पान गळून गेले….

आयुष्याचे पुस्तक… एक साधी डायरी..
गळक्या पानांचे पुस्तक नाही
असे फक्त शिल्लक रद्दी….
असे एक गळके पान आयुष्यातले….
आठवणींसकट गळून गेल….
ना पलटले पुन्हा मागच पान..

पुढे आयुष्य चालतच गेल….

नोव्हेंबर 18, 2008 at 7:33 pm यावर आपले मत नोंदवा

Older Posts


अलीकडील पोस्ट

काळ

नोव्हेंबर 2017
सो मं बु गु शु
« फेब्रुवारी    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
Page copy protected against web site content infringement by Copyscape

Blog Stats

  • 22,223 hits

Flickr Photos